Whats new

एचएमटीची तीन युनिट सरकारकडून बंद

 HMT

 

केंद्र सरकारने एचएमटीच्या तीन अव्यवहार्य (नुकसानकारक) युनिटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकप्रिय एचएमटी घडय़ाळे, एचएमटी चिनार घडय़ाळे आणि एचएमटी बेअरिंग्ज यांचा समावेश आहे. हे युनिट बंद करण्यात आल्यामुळे कर्मचाऱयांना 2007 च्या वेतना अनुसार आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना घेण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयावरील कॅबिनेट समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. 427.48 कोटी रुपयाच्या रोख मदतीसह एचएमटी लिमिटेडच्या तीन नुकसान करणाऱया कंपन्या एचएमटी घडय़ाळे, एचएमटी चिनार घडय़ाळे आणि एचएमटी बेअरिंग्ज बंद होणार आहे. त्यामुळे येथील कंपन्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगण्यात आले आहे.

एचएमटी घडय़ाळे, एचएमटी चिनार घडय़ाळे आणि एचएमटी बेअरिंग्जच्या कर्मचाऱयांना अडचणींवर मात करण्यासाठी कॅबिनेटने 2007 च्या वेतन स्तरावर स्वेच्छानिवृत्ती घेण्याची आणि कंपन्या बंद करण्यासाठी मंजुरी दिली आहे.कंपन्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता याचा निपटारा सरकारी धोरणानुसार करण्यात येईल, असे सरकारी सूत्रांनी माहिती देताना म्हटले आहे.