Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

चौथे पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन 8 जानेवारीला

 KIR

 

महाराष्ट्र साहित्य परिषद व किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव यांच्यावतीने चौथे पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन 8 जानेवारीला सर परशुराम महाविद्यालय पुणा येथे भरवण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी डॉ. हेमा साने असणार आहेत, अशी माहिती मसापच्या कार्याध्या डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महोत्सवाचे विरेंद्र चित्राव, स.प महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप शेठ उपस्थित होते.

एकदिवसीय या संमेलनाचे उद्घाटन डॉ.साने यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी त्या पर्यावरणस्नेही जीवनशैली या विषयावर संवाद साधणार आहेत. तसेच डॉ. सुनिल कुलकर्णी ‘कार्बन फुट प्रिंट’ या विषयावर तर कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉ. अमर आडके हे शिवाजी महाराजांची पर्यावरणनीती’ या विषयावर आपले विचार मांडतील. समारोपात ज्येष्ठ जलतज्ञ डॉ.माधवराव चितळे पर्यावरण आणि कुशल नगरी याविषयावर भाष्य करणार आहेत. हे संमेलन सर परशुराम महाविद्यालयाच्या दृकश्राव्य दालनात होणार असून सर्वांसाठी विनामुल्य असणार आहे.