Whats new

पीपल चॉईस मध्ये प्रियांका चोप्राने जिंकला 'क्वांटिको'साठी फेव्हरेट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड

 priynka chopra

 

लॉस एंजिलिसमध्ये पार पडलेल्या पीपल्स चॉईस अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने फेव्हरेट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड आपल्या नावी केला. 'क्वांटिको' या टीव्ही सीरिजसाठी तिला हा अवॉर्ड मिळाला. हॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्रींना मात देत कोरले पुरस्कारावर नाव फेव्हरेट अॅक्ट्रेसच्या किताबासाठी प्रियांकासह एमा रॉबर्ट्स, जेमी ली कर्टिस, ली मिशेले आणि मर्सिया गे हार्डेन या अभिनेत्रींमध्ये चुरस होती. मात्र हॉलिवूडच्या या अभिनेत्रींना मात देत प्रियांकाने या अवॉर्डवर आपले नाव कोरले. या अवॉर्ड सोहळ्यात प्रियांका फेव्हरेट अॅक्ट्रेस तर जॉन स्टॅमॉसला फेव्हरेट अॅक्टरचा किताब मिळाला. स्टेजवर अवॉर्ड स्वीकारताना प्रियांकाने आपल्या आईला धन्यवाद दिले.