Whats new

महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धेत दोन मल्लांनी घेतले उत्तेजक द्रव्य; पुढच्या वर्षीपासून होणार डोपिंग चाचणी

 kushti

 

महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धेलाही आता डोपिंगचा डंख लागला आहे. कुस्ती सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच दोन खेळाडू उत्तेजक द्रव्य घेताना सापडले. या दोन खेळाडूंना आयोजकांनी ताब्यात घेतले. दोघांना समज देऊन स्पर्धेबाहेर करण्यात आले. करिअरचा विचार करूनच या दोघांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत, असे स्पर्धेचे आयोजन प्रमुख, ऊर्जामंत्री नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

चिटणीस पार्क स्टेडियममध्ये एका टेबलवर रिकामे इंजेक्शन सिरिंज मिळाल्या. गादी-मातीवरील प्राथमिक फेरीच्या लढतींना सुरुवात झाली. तत्पूर्वी काही मल्लांनी बलवर्धक औषध घेतले, ते इंजेक्शन सिरिंज नेण्यास विसरून गेले.

पुढच्या वर्षीपासून डोपिंग चाचणी
पुढच्या वर्षीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मल्लांची डोपिंग चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य कुस्तीगीर परिषदेने कार्यकारिणी बैठकीत घेतल्याची माहिती स्पर्धेचे तांत्रिक प्रमुख व आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांनी दिली. अतिरिक्त खर्च करणे शक्य नसल्यामुळे आजवर चाचणीची सोय नव्हती. मात्र, असे खेळाला काळिमा फासणारे कृत्य करणा-यांवर वचक बसवण्यासाठी पुढच्या वर्षीपासून डोपिंग चाचणी अनिवार्य केली जाईल, असे त्यांनी सांगितले.