Whats new

ऑन डिमांड व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा देणारी ‘नेटफ्लिक्स’चे भारतीय बाजारात पदार्पण

 netflex

 

ऑन-डिमांड व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा देणा-या ‘नेटफ्लिक्स’ या कंपनीने भारतीय बाजारात पदार्पण केले आहे. नेटफ्लिक्सची सेवा आता जगातील १९० देशांमध्ये सुरू झाली आहे. अर्थातच, भारतातील वाढत्या संख्येच्या ‘नेटक-यां’साठी ही चांगली बातमी असली, तरीही यामुळे ‘ऑन-डिमांड व्हिडिओ स्ट्रिमिंग’ सेवा देणा-या सध्याच्या कंपन्यांसमोर तगडा प्रतिस्पर्धी उभा ठाकणार आहे.

काय आहे ‘नेटफ्लिक्स’?
चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यासाठीची रेंटल सर्व्हिस म्हणजे ‘नेटफ्लिक्स’. इंटरनेटवरील स्ट्रिमिंग आणि ई-मेलच्या माध्यमातून युझर्सला त्यांच्या मागणीनुसार व्हिडिओ पुरवले जातात. प्रेक्षकांना जे पाहायचे आहे, तेवढ्याचेच पैसे मोजावे लागत असल्याने पाश्चात्य देशांमध्ये ही सेवा लोकप्रिय आहे.

सेवेसाठी हे हवे
‘नेटफ्लिक्स’ वापरण्यासाठी ४ जी कनेक्शन असणे आवश्यक आहे. भारतात सध्या केवळ ‘एअरटेल’च ४जी सुविधा देत असले, तरी ‘रिलायन्स’नेही प्रायोगिक तत्त्वावर कर्मचा-यांसाठी नुकतीच ४जी सेवा सुरू केली आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात आपल्याकडे हे दोन पर्याय असतील.

अशी आहे यंत्रणा-
तुम्हाला जे चित्रपट किंवा कार्यक्रम पाहायचे आहेत, त्याची लिस्ट ‘नेटफ्लिक्स’कडे मेलद्वारे पाठवावी.
मेलवरून लिस्ट येऊन पेमेंट झाल्यानंतर कार्यक्रमांच्या लिंक्स पाठवल्या जातात.
इंटरनेटच्या मदतीने तुम्ही त्या लिंक्सद्वारे कार्यक्रम पाहू शकता.
संयुक्त राष्ट्रात डीव्हीडी आणि ब्ल्यू रे डिस्क भाडेतत्त्वावर देण्याच्या सुविधाही ‘नेटफ्लिक्स’ने उपलब्ध केल्या आहेत.
नवीन डिस्कची मागणी करताना पहिली डिस्क सुपूर्त करावी लागते.
चित्रपट आणि टीव्ही नेटवर्कशी भागीदार असलेली ‘नेटफ्लिक्स’ स्वत:चे शोजही बनवते.

हे आहेत प्रमुख स्पर्धक
यू ट्यूब : काही व्हिडिओज मोफत उपलब्ध
इरॉस नाऊ : सबस्क्रिप्शन फी ४९ रु.
हंगामा : २४९ रु. प्रतिमहिना

नेटफ्लिक्स : दर प्रतिमहिना
५०० रु. : एका स्क्रीनसाठी
६५० रु. : दोन स्क्रीनसाठी एचडी कंटेंट
८०० रु. : चार स्क्रीनसाठी ४ के कंटेंट

व्हिडिओ पाहणारे भारतीय नेटिझन्स
५५ टक्के भारतीय नेटिझन्स रोज व्हिडिओ पाहतात
६.९ कोटी नेटफ्लिक्सचे यूझर्स
१ अब्ज यू-ट्यूबचे यूझर्स