Whats new

'सीओईपी'च्या पेन किलरला 'पुरुषोत्तम'चे महाविजेतेपद

 purushottam

 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) पेन किलर या एकांकिकेने यंदाच्या पुरुषोत्तम करंडक महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या राज्यस्तरीय महाअंतिम फेरीचे विजेतेपद दिमाखात पटकावले. विशेष म्हणजे, बहुतांश महत्त्वाची इतर पारितोषिकेसुद्धा यंदा पुणे केंद्रालाच मिळाली. अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

महाराष्ट्रीय कलोपासक तर्फे आयोजित या फेरीचे यंदा पाचवे वर्ष होते. पुण्यासह मुंबई, नागपूर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि जळगाव अशा एकूण सहा केंद्रांवरील 20 महाविद्यालयांच्या एकांकिका स्पर्धेत सादर झाल्या. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, रंगकर्मी प्रदीप वैद्य व डॉ. प्रवीण भोळे यांनी महाअंतिम फेरीचे परीक्षण केले.

महाअंतिम फेरीचा निवडक निकाल
· सांघिक प्रथम पारितोषिक : एकांकिका पेन किलर : सीओईपी, पुणे
· सांघिक द्वितीय : एकांकिका सरहद : पीआयसीटी, पुणे
· सांघिक तृतीय : एकांकिका विश्वनटी : डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, नागपूर
· सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका पारितोषिक : ती आणि आपण : जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे
· शिवाय, अभिनय नैपुण्याची दोन पारितोषिके व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक पुण्याला