Whats new

बैलगाडी शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली

 sharyat

 

ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. शेतकरी बैलांची काळजी घेतात. त्यांना प्रेमाने सांभाळतात. शर्यतीसाठी धावणा-या बैलांची तर विशेष काळजी घेतली जाते. तरीही शर्यतीत बैलांचा छळ होत असल्याची अत्यंत चुकीची तक्रार केली जात होती. त्याच्या आधारावर यापूर्वीच्या कॉंग्रेस आघाडी सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. या बंदीमुळे शेतक-यांमध्ये नाराजी होती. बंदी उठवावी म्हणून काही ठिकाणी शेतक-यांनी आंदोलने केली होती. ग्रामीण भागतील या पारंपारिक लोकप्रिय खेळावरील बंदी उठवावी अशी शेतक-यांची मागणी होती. .

Next >>