Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

स्पेनमध्ये लग्नाची वयोमर्यादा 14 वरून 16 वर

MARRIAGE  

लग्नाची सर्वात कमी वयोमर्यादा असणाऱ्या स्पेनमध्ये आता लग्नाचे वय 14 वरून 16 करण्यात आले आहे. यापूर्वी स्पेनमध्ये 14 वर्ष असणाऱ्या मुला-मुलींच्या लग्नासाठी कायदेशीर परवानगी होती. स्पेन सरकारने 2013 मध्येच लग्नासंबधी कायद्यात बदल करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता हा नवा कायदा लागू करण्यात आला. यूनिसेफ आणि मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी स्पेनच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

स्पेनच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेनमध्ये 2000 ते 2014 च्या दरम्यान 365 विवाह झाले आहेत, ज्यात लग्न करणाऱ्यांचे वय हे 16 पेक्षा कमी होते. तर 2014 मध्ये असे फक्त 5 विवाह झाले आहेत.