Whats new

‘नासा’कडून पृथ्वीसारख्या नव्या ग्रहाचा शोध

NASA  

शेकडो वर्षांपासून मानव अंतराळात ज्याचा शोध घेत आला, तो 'नासा'च्या नव्या संशोधनामुळे दृष्टिपथात आला आहे. 'नासा'ने १४०० प्रकाशवर्ष दूर असलेला एक ग्रह शोधला असून, त्याचे अवकाश गुणधर्म पृथ्वीशी मिळतेजुळते आहेत.

नासा'च्या २००९ सालपासूनच्या शोधमोहिमेला अखेर यश आले असून, केपलरस्केप दुर्बिणीने या पृथ्वीसदृश ग्रहाचा शोध लावला आहे. केपलर ४५२बी असे या ग्रहाचे नाव ठेवण्यात आले असून, त्याचा पृष्ठभाग पृथ्वीप्रमाणेच आहे. पृथ्वीप्रमाणेच हा ग्रह एका सूर्यासारख्या ताऱ्याभोवती निश्चित कक्षेत प्रदक्षिणा घालतो. तसेच त्याचा पृष्ठभाग खडकाळ आहे. विशेष म्हणजे हा ग्रह अधिक उष्णही नाही किंवा अधिक शीतही नाही!

पण अवकाशशास्त्रज्ञांना या ग्रहाविषयी एक चिंता आहे. या ग्रहाचा सूर्य आपल्या सूर्यापेक्षा दीड अब्ज वर्षे जुना आहे. तसेच तो सूर्यापेक्षा १० टक्के अधिक प्रकाशमान आहे. त्याच्या अतिउष्ण ऊर्जेमुळे या ग्रहावरील पाण्याच्या स्रोतांची किंवा सागराची वाफ झाली असण्याची शक्यता आहे. पण तरीही यामुळे पृथ्वीची आणखी काही अब्ज वर्षांनंतर कशी स्थिती असेल, हे या ग्रहाच्या संशोधनानंतर समजू शकेल, हे या मोहिमेचे यश ठरावे.