Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

‘फॉर्च्युन 500’ मध्ये भारतातील 7 कंपन्यांचा समावेश

WALMART  

जगातील 500 मोठ्या कंपन्यांच्या यादीत भारताच्या 7 कंपन्यांना स्थान मिळाले आहे. ‘फॉर्च्युन’द्वारे बनविण्यात आलेल्या या यादीत ‘वॉलमार्ट’ अग्रस्थानी आहे. या यादीत इंडियन ऑइल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्स यांचाही समावेश आहे.

भारतीय कंपन्या :
2015 फॉर्च्यून ग्लोबल 500’ या यादीत इंडियन ऑइल (उत्पन्न जवळपास 74 अब्ज डॉलर, 119 व्या स्थानी) आहे. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज (62 अब्ज डॉलर, 158 व्या स्थानी), टाटा मोटर्स (42 अब्ज डॉलर, 254 व्या स्थानी), भारतीय स्टेट बँक (42 अब्ज डॉलर, 260 व्या स्थानी), भारत पेट्रोलियम (40 अब्ज डॉलर, 280 व्या स्थानी), हिंदुस्थान पेट्रोलियम (35 अब्ज डॉलर) आणि आयओसी (26 अब्ज डॉलर, दोघेही 449 व्या स्थानी) यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे इंडियन ऑइल, रिलायन्स, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि ओएनजीसी यांच्या स्थानात मागील वर्षाच्या तुलनेत घसरण झाली असून टाटा मोटर्स आणि एसबीआय यांच्यात सुधारणा झाली. जगातील 500 मोठ्या कंपन्यांनी वर्ष 2014 मध्ये 31.2 लाख कोटी डॉलर उत्पन्न आणि 1.7 लाख कोटी डॉलर एवढा नफा कमविला होता. यावर्षी ‘फॉर्च्यून ग्लोबल 500’ मध्ये एकूण 6.5 कोटी कर्मचारी असून हे 36 देशांमध्ये आहे.

वॉलमार्ट अग्रस्थानी :
फॉर्च्युनच्या यादीत ‘वॉलमार्ट’ पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी चीनची पेट्रोलियम कंपनी ‘सिनोपेट ग्रुप’, हॉलंडची रॉयल डच शेल (3), चायना नॅशनल पेट्रोलियम (4) आणि एक्सोन मोबिल (5) स्थानी आहेत.

सर्वात जास्त कंपन्या अमेरिकेतील :
500 मोठ्या कंपन्यांमध्ये 128 कंपन्या अमेरिकेच्या आहेत. यामध्ये ऍपल, जेपी मॉर्गन, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, गुगल, पेप्सीको, इंटेर, गोल्डमॅन सॅक आदींचा समावेश आहे. यामध्ये चीनच्या 100 कंपन्यांचा समावेश आहे.