Whats new

ब्रँडिंगमध्ये जगातील अव्वल दहा खेळाडूंमध्ये धोनी

DHONI  

जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या क्रीडापटूंमध्ये (मार्केटेबल अँथलीट) भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पोतुर्गालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेटिनचा लिओनेल मेस्सीला मागे टाकणारा धोनी नवव्या स्थानी आहे.

लंडन स्कूल ऑफ मार्केटिंगने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या अव्वल २0 क्रीडापटूंमध्ये धोनीच्या रूपाने एकमेव क्रिकेटपटू आहे. जगप्रसिद्ध टेनिसपटू स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडररने अव्वल स्थान पटकावले आहे. टॉप टेनमध्ये तीन गोल्फपटू, तीन टेनिसपटू, दोन बास्केटबॉलपटू तसेच एक क्रिकेटपटू आणि एका फुटबॉलपटूचा समावेश आहे. गोल्फपटू टायगर वुड्स दुसर्या , एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविच सातव्या, स्पेनचा राफाएल नाडाल आठव्या तसेच रोनाल्डो दहाव्या स्थानी आहे.

टॉप ट्वेन्टीमध्ये महिला टेनिसपटू रशियाची मारिया शारापोवा, लिओनेल मेसी, ब्राझीलला फुटबॉलपटू नेमार, बॉक्सर फ्लॉयड मेवेदर आणि अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विल्यम्सचा समावेश आहे. जगप्रसिद्ध धावपटू जमैकाचा उसेन बोल्ट १४व्या स्थानी आहे.

रॉजर फेडरर (टेनिस), टायगर वुड्स (गोल्फ), फिल मिकलसन (गोल्फ), लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल), केव्हिन डुरँट (बास्केटबॉल), रॉरी मॅकरॉय (गोल्फ), नोवाक जोकोविच (टेनिस), राफेल नाडाल (टेनिस), महेंद्रसिंग धोनी (क्रिकेट), ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉल), कोब ब्रायंट (बास्केटबॉल), मारिया शारापोवा (टेनिस), लिओनेल मेसी (फुटबॉल)उसेन बोल्ट (अँथलेटिक्स, ट्रॅक), नेमार (फुटबॉल), अँडी मरे (टेनिस), की निशिकोरी (टेनिस), डेरीक रोस (बास्केटबॉल), फ्लॉयड मेवेदर (बॉक्सिंग), सेरेना विल्यम्स (टेनिस)चा समावेश आहे.