Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

भारतातील लक्ष्मीपुत्रांची परदेशात धाव

INDIAN FORENOR  

भारतातील विविध क्षेत्रांतील सरस्वतीपुत्र परदेशात स्थिरावत असताना आता लक्ष्मीपुत्रांनीही हाच मार्ग पत्करला आहे. मागील चौदा वर्षांच्या अवधीमध्ये 61 हजार कोट्यधीशांनी परदेशात स्थायिक होणे पसंत केले असून, त्यांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व देखील स्वीकारल्याचे दिसून आले. "न्यू वर्ल्ड हेल्थ‘ आणि "एलआयओ ग्लोबल‘ या दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्का दायक माहिती समोर आली आहे. करधोरण, सुरक्षितता आणि पाल्याच्या शिक्षणासाठी ही मंडळी परदेशात जात आहेत.

विशेष म्हणजे चीनमधूनही मोठ्या प्रमाणावर श्रीमंत मंडळी परदेशात जात असल्याचे दिसून आले. चीनमधील 91 हजार गर्भश्रीमंतांनी परदेशात धाव घेतल्याचे ताजी आकडेवारी सांगते. भारतामधील बहुतांश मंडळी संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन राहत आहेत. तर चिन्यांचा ओढा हा अमेरिका, हॉंगकॉंग, सिंगापूर आणि ब्रिटनकडे असल्याचे दिसून येते. मागील चौदा वर्षामध्ये सव्वा लाख लोक परदेशातून येऊन ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहेत.

देश परदेशी गेलेले नागरिक :
फ्रान्स................ 42000
इटली.................23000
रशिया................20000
इंडोनेशिया...........12000
दक्षिण आफ्रिका........8000
इजिप्त...................7000