Whats new

टूर दि फ्रान्स स्पर्धेत ख्रिस प्रूमे दुसऱ्यांदा जेता

TOUR DE FRANCE  

ब्रिटनच्या ख्रिस प्रूमेने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा प्रतिष्ठेची टूर दि फ्रान्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला. मागील 3 वर्षातील त्याचे हे दुसरे जेतेपद असून यामुळे तो ग्रँड टूर स्पेशालिस्ट म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे.

30 वर्षीय प्रूमेने कोलंबियाच्या नैरो क्विन्टानाला 1 मिनिट व 12 सेकंदाने पिछाडीवर टाकत अव्वलस्थान काबीज केले तर त्याचा मॉव्हिस्टरचा स्पॅनिश संघसहकारी अलेजांड्रो व्हॅल्वेर्डे 5 मिनिटे 25 सेकंदांनी पिछाडीसह तिसऱया स्थानी आला.

2015 टूर दि फ्रान्स स्पर्धा प्रामुख्याने प्रूमे, क्विन्टाना, अल्बर्टो कॉन्टॅडोर व व्हिन्सेन्झो निबॅली या चौघांमध्येच अधिक रंगली. प्रूमेने दहाव्या फेरीत आघाडी घेताना कमाल केली. त्या फेरीत त्याने क्विन्टानावर मात केली होती. क्विन्टानाने यंदा सलग दुसऱयांदा 25 वर्षाखालील वयोगटात सर्वोत्तम रायडर्सचा व्हॉईट जर्सी पुरस्कार पटकावला. गुणांच्या विभागणीनुसार स्लोव्हाकियाच्या पीटर सॅगनने सलग चौथ्यांदा ग्रीन जर्सीवर कब्जा केला. प्रेंचमन रॉबेट बर्डेटला सर्वात ‘आक्रमक रायडर’ तर मोव्हिस्टरने सांघिक स्तरावरील पुरस्कार मिळवला.