Whats new

भारतीय महिला तिरंदाजी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

mahila tirandaj team  

तिरंदाजीमध्ये भारतीय महिला रिकर्व संघ रियो ऑलिम्पिक २०१६ साठी पात्र ठरला पण, पुरुष संघाला मात्र तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये चांगली आघाडी मिळविल्यानंतरही पराभवाला सामोरे जावे लागले. सातवे मानांकन प्राप्त जर्मनीविरुद्ध १-३ ने पिछाडीवर असताना भारताच्या दीपिका कुमारी, लक्ष्मी राणी मांझी व रिमिल बुरिउली यांनी चमकदारी कामगिरी करीत ५-३ ने विजय साकारला. भारतीय महिला संघाने अंतिम आठमध्ये स्थान मिळविताना ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.

राहुल बॅनर्जी, मंगल सिंग चम्पिया व जयंत तालुकदार यांच्यासारख्या अनुभवी तिरंदाजांचा समावेश आहे.पोर्णिमा महतो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महिला संघाने चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाने निर्णायक सेटमध्ये ५३-५२ ने सरशी साधताना ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला. आता दहावे मानांकन प्राप्त भारतीय संघाला कोलंबियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.