Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

फोक्सवॅगन बनली जगातील सर्वात मोठी वाहन कंपनी

Fox-vegoan  

जगाच्या सर्वात मोठय़ा कार निर्माता कंपनीचे स्थान आता फोक्सवॅगनच्या नावावर झाले आहे. या प्रतिस्पर्धेत कंपनीने जपानच्या टोयोटाला मागे टाकले आहे. जाहीर झालेल्या विक्रीच्या आकडेवारीनुसार जर्मनीची कंपनी यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत विक्रीत टोयोटाच्या पुढे गेली आहे.

टोयोटाने यावेळी जानेवारी-जूनच्या सहामाहीत 50.2 लाख वाहने विकली आहेत तर फोक्सवॅगनचा आकडा 50.4 लाखावर पोहोचला. तिन नंबर च्‍या स्थानावर अमेरिकेची जनरल मोटर्स राहिली. ज्याचा सहामाही विक्री आकडा 48.6 लाख आहे. टोयोटाने 20085 मध्ये जीएमला पहिल्या स्थानावरून दूर केले होते. जपानमध्ये 2011 च्या त्सुनामीनंतर ती पुन्हा एका दुस-या स्थानावर आली, परंतु 2012 मध्ये पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचली. परंतु जपानी कार कंपनीला यावर्षी आपली विक्री कमी होत 1 कोटीपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. 2014 मध्ये कंपनीने 1 कोटी 2 लाख कार विकल्या होत्या.