Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

२०२२ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश

PAPULATION  

लोकसंख्येच्या बाबतीत भारत २०२२ मध्येच, म्हणजे याआधीच्या अंदाजाच्या सहा वर्षे आधीच चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल, असे भाकीत संयुक्त राष्ट्रांनी वर्तवले आहे. सन २१००पर्यंत भारत या स्थानी कायम राहील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या 'जागतिक लोकसंख्या : २०१५ चा सुधारित अंदाज' हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. सध्या चीनची लोकसंख्या १३८ कोटी, तर भारताची १३१ कोटी आहे. २०२२मध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल. भारताच्या लोकसंख्येतील वाढ सुरू राहून २०३०मध्ये १५० कोटी, तर २०५०मध्ये १७० कोटी होईल. त्यानंतर ती काहीशी घटून शतकाच्या अखेरीपर्यंत १६६ कोटी होईल. मात्र, तरीही भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश राहील, असा अंदाज अहवालात वर्तवला आहे. चीनची लोकसंख्या २०३०पर्यंत साधारणपणे कायम राहून त्यानंतर अल्प प्रमाणात घसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज या अहवालात मांडण्यात आला आहे.

भारत तरुणच
याआधी २०१३मध्ये जाहीर केलेल्या अंदाजानुसार, भारत २०२८मध्ये चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असे भाकीत वर्तवण्यात आले होते.अंदाजापेक्षा सहा वर्षे आधीच चीनला मागे टाकणार. जगाची लोकसंख्या सध्या ७३० कोटी असून, २०३०पर्यंत ही ८५० कोटी, २०५०पर्यंत ९७० कोटी; तर २१०० पर्यंत ११२० कोटी होण्याचा अंदाज आहे.