Whats new

रंगीबेरंगी फुलांच्या गालिच्यात हरवले‘अटाकामा’चे वाळवंट

FLOWERS

यंदा ‘अलनिनो’मुळे महाराष्ट्रासह भारताचा बहुतांश भाग दुष्काळाने होरपळत असताना दक्षिण अमेरिकेतील अटाकामा वाळवंट अलनिनोमुळे रंगीबेरंगी फुलांच्या गालीच्यात हरवून गेले आहे. अलनिनोमुळे हा संपूर्ण वाळवंटी प्रदेश फुलांच्या ताटव्यांनी बहरला आहे.
दक्षिण अमेरिकेत प्रशांत महासागराच्या परिसरात असलेला अटाकामा हा संपूर्ण प्रदेश वाळवंटी आहे. या प्रदेशात गेल्या चार वर्षांपासून पावसाचा थेंबही पडला नाही. 105,000 किलोमीटरचा हा प्रदेश शुष्क वाळवंट आहे. यंदा प्रशांत महासागराच्या आजुबाजुच्या परिसरात अलनिनोच्या प्रभावाने हवामानात बदल झाल्याचे दिसून येत आहे. हा बदल जगासाठी इशारा असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, अलनिनोच्या प्रभावाने सेंटियागोपासून उत्तरेला 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या अटाकामातील हुआसको परिसर सध्या रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेला आहे. जवळपास 500 प्रकारच्या विविध रंगीबेरंगी फुलांनी या भागाचे नंदनवनात रूपांतर झाले आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलेही आपसुकच अटाकामाकडे वळू लागली आहेत. थाइम, लेरेटा, सॉल्टग्रास यासह विविध जातीच्या फुलांची मुक्त उधळण या परिसरात पहायला मिळत आहे.