Whats new

'जीडीपी'मध्ये आयपीएलचा वाटा 11 अब्ज रुपयांचादा

IPL-8

2015 वर्षी झालेल्या आठव्या आयपीएल स्पर्धेने भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) 11.5 अब्ज रुपयांचा वाटा उचलला असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली.
भारताच्या अर्थव्यवस्थेतील आयपीएलच्या उत्पन्नाचा प्रभाव किती याचे सर्वेक्षण करण्यासाठी बीसीसीआयने ‘केपीएमजी‘ या क्रीडा सल्लागार समूहाची नियुक्ती केली होती. आठव्या आयपीएल स्पर्धेत आठ संघ 44 दिवसांत देशातील 12 शहरांमधील 13 केंद्रांवर एकूण 60 सामने खेळले.
या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आयपीएलने भारताच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम केल्याचे समोर आले आहे. स्पर्धेदरम्यान पर्यटन व्यवसायाला चालना मिळते, त्याचबरोबर विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतो. आठव्या मोसमातील स्पर्धेत एकूण 193 क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला. तब्बल 17.1 लाख दर्शकांनी या सामन्याचा आनंद लुटला. आयपीएलच्या सामन्यातून अंदाजे 26.5 अरब रुपयांची आर्थिल उलाढाल झाली असल्याचे या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
याबाबतीत आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, खरं म्हणजे ही खूप आनंदाची आणि प्रोत्साहन देणारी बाब आहे. आयपीएलचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्कम प्रभाव पडतो याचा आनंद आहे. सुमारे ६० दिवसांच्या स्पर्धेतून जीडीपीमध्ये ११ अब्ज ५० करोड रुपयांचा योगदान होतो, हे स्पर्धेच्या यशस्वीतेचा पुरावा आहे.