Whats new

भारताचा विकास दर 7.5 टक्के राहणार

WORLD BANK

जागतिक बँकेने 2015-16 साठी भारताचा विकास दर 7.5 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. येणा-या काही महिन्यांमध्ये विकास दरात सतत वृद्धी होत राहणार असली तरी त्याची गती मंद राहील असे बँकेने अहवालात म्हटले आहे.
भारतामध्ये विकासाची प्रक्रिया सतत सुरू असून नवीन सरकार उद्योग वाढीसाठी प्रयत्न करत आहे. त्यांना यामध्ये यश येत आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदीमध्ये असतानाही भारतात विकास दरामध्ये वाढ होत आहे हे उत्तम अर्थव्यवस्था असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास दर 2015-16 मध्ये 7.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. 2016-17 मध्ये विकास दरात वाढ होऊन 7.8 तर 2017-18 मध्ये 7.9 टक्के होणार आहे. 2015-16 ते 2017-18 या दरम्यान गुंतवणुकीचा दर 8.8 राहिल्यास हे शक्य आहे, असे जागतिक बँकेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
भारताने जागतिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर त्याचा फायदा घेत पेट्रोल आणि डिझेलवर असणारे अनुदान बंद केले आहे. कमीत कमी अनुदान आणि जास्त कर लावल्यामुळे भारताकडे मोठय़ा प्रमाणात गंगाजळी उपलब्ध झाली आहे. याचा वापर भारताने पायाभूत विकास करण्यासाठी केला आहे.
बँकिंग क्षेत्र आणि पायाभूत देणा-या कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक गरज निर्माण झाली आहे. अनेक कर्ज प्रकरणे अडकलेली आहेत. आणि सार्वजनिक क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणावर दबाव आहे. बँकांनी तीन चतुर्थांश टक्के घरगुती कर्जाचे वितरण केले आहे. भारत अर्थव्यवस्थेमध्ये सक्षम होत जाईल, असा अर्थतज्ञांना विश्वास आहे. सरकारला महसूल वाढविण्यासाठी प्रत्यक्ष करांची निकड सध्या निर्माण झाली आहे. भारत प्रत्यक्ष कर गोळा होण्यामध्ये जगात सर्वात पिछाडीवर आहे. प्रत्यक्ष कर संग्रह जीडीपीमध्ये केवळ 5.7 टक्के आहे. इतर देशांमध्ये प्रत्यक्ष करांचा जीडीपीमधील वाटा 11.4 टक्के आहे. यामुळे भारताने प्रत्यक्ष करामध्ये वाढ करण्याची गरज आहे, असे सँडर यांनी म्हटले आहे