Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

WTA फायनल, सानिया-हिंगिस जोडीने पटकावले विजेतेपद

SANIYA

डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिस या जो़डीने स्पेनच्या जोडीचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सानिया-हिंगिस या जोडीचे यंदाच्या वर्षातील हे नववे विजेतेपद आहे.

टेनिसमध्ये ग्रँडस्लॅमनंतर डब्ल्यूटीए ही सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व तिची सहकारी मार्टिना हिंगिस या जोडीने चमकदार कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. अंतिम सामन्यात सानिया - हिंगिस जोडीसमोर स्पेनच्या गार्बाइन मुरुगुजा आणि कार्ला नुवारो या जोडीचे आव्हान होते. सानिया - हिंगिस जोडीने प्रतिस्पर्धी जोडीचा ६-०, ६-३ असा सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.