Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

जीवसृष्टीस अनुकूल मूलद्रव्ये विश्वात इतरत्रही उपलब्ध

SCIENCE

कन्या तारकासमूहातील क्ष किरण बाहेर टाकणा-या तप्त वायूंचे निरीक्षण केले असता विश्वात पृथ्वीवर जीवसृष्टीसाठी जेवढय़ा प्रमाणात जैवघटक मूलद्रव्ये उपलब्ध आहेत तेवढेच विश्वात इतरत्रही उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तारे, ग्रह व जीवसृष्टी तयार करण्यासाठी लागणारी मूलद्रव्ये विश्वाच्या लाखो प्रकाशवर्षांच्या भागात समान वितरित झालेली आहेत, ही बाब १० अब्ज वर्षांपूर्वी घडली आहे. कन्या तारकासमूह ५,४ कोटी प्रकाश वर्षे दूर असून त्यातून प्रखर क्ष किरण बाहेर पडतात. या तारकासमूहात दोन हजार दीर्घिका असून त्यांच्यामधील जागा ही तप्त क्ष किरणांनी भरलेली आहे. जपानच्या सुझाकू क्ष किरण उपग्रहाच्या मदतीने जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी या संस्थेचे खगौल भौतिक शास्त्रज्ञ श्रीमती ऑरोरा सिमियानस्कू यांनी हे निरीक्षण सागामहिरा येथे केले. या तारकासमूहाचे बाहू केंद्रापासून ५० लाख प्रकाशवर्षे इतक्या अंतरापर्यंत पसरलेले आहेत. वेगवेगळे नवतारे वेगवेगळी रसायने तयार करतात. त्याचा गाभा कोसळल्यानंतर नवता-या तील मूलद्रव्ये पसरतात. त्यात ऑक्सिजन ते सिलिकॉनपर्यंतच्या मूलद्रव्यांचा समावेश असतो. बटू स्फोटांमध्ये लोह व निकेल अशी जड मूलद्रव्ये बाहेर पडतात. जेव्हा अतिनवताऱ्यातील रासायनिक मूलद्रव्ये विखरतात व आंतरतारकीय अवकाशात पसरतात तेव्हा ते ताऱ्यांच्या असंख्य पिढय़ांमध्ये समाविष्ट होत असतात. यापूर्वी कावली इन्स्टिटय़ूट फॉर पार्टिकल अॅस्ट्रोफिजिक्स अँड कॉस्मॉलॉजी या स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या संस्थेतील नोरबर्ट वेर्नर यांनी सुझाका उपग्रहाची माहिती वापरून ययाती तारकासमूहाचा अभ्यास केला असता त्यांना लोहाचे समान वितरण दिसले पण ज्या अतिनवता-या चे केंद्र कोसळले आहे अशांच्या बाबतीत हलक्या मूलद्रव्यांचे वितरण कसे झाले आहे हे समजलेले नाही.

कन्या तारकासमूहातील निरीक्षणात काही हरवलेले दुवे सापडले असून सिमियॉनेस्कू व त्यांच्या सहका-यानी लोह, मॅग्नेशियम, सिलीकॉन व सल्फर दीर्घिकेमध्ये पसरलेले पहिल्यांदा दिसून आले आहे. मूलद्रव्यांचे गुणोत्तर प्रमाण संपूर्ण तारकासमूहाच्या आकारमानात समान दिसते. सूर्य व इतर दीíघकांतील ताऱ्यांची रचनाही तशीच समान आढळून आली आहे. या अभ्यासातून असे दिसून आले की, विश्वात रासायनिक मूलद्रव्ये पसरलेली असून त्यात फारसा फरक नाही. सारख्याच प्रकारच्या अतिनवता-या मध्ये मूलद्रव्ये सारखीच असतात. सूर्यमालेच्या निर्मितीत जी द्रव्ये होती तीच विश्वात आहेत. पृथ्वीवर सजीवसृष्टीस आवश्यक असलेली जी मूलद्रव्ये आहेत ती सर्वसाधारणपणे विश्वात सारखीच पसरलेली आहेत असे सिमियॉनेस्कू यांचे मत आहे. अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.