Whats new

भारताच्या युकी भांब्रीने केपीआयटी - एमएसएलटीए चॅलेंजर टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकाविले

INDIAN YUKI BHAMBHRI

50 हजार अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या केपीआयटी -एमएसएलटीए चॅलेंजर टेनिस स्पर्धेत येथे भारताच्या युकी भांब्रीने एकेरीचे विजेतेपद पटकाविले. 2015 च्या टेनिस हंगामातील युकीचे हे दुसरे विजेतेपद आहे.

अंतिम सामन्यात युकीने द्वितीय मानांकित रशियाच्या डॉनस्कॉयचा 6-2, 7-6 (7-4) असा पराभव केला. चॅलेंजर पातळीवरील स्पर्धेतील युकीचे हे पाचवे विजेतेपद आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत युकीच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसून येत असून त्यानी यापूर्वी शांघायमधील चॅलेंजर स्पर्धा जिंकली तर तैवानच्या स्पर्धेत त्याने उपविजेतेपद मिळविले. युकीला या स्पर्धेत 80 गुण मिळाले. आता थायलंडमध्ये होणा-या 125,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या हुआ हिन खुल्या चॅलेंजर स्पर्धेत भांब्री सहभागी होणार आहे.