Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

प्रगतीशील देशांपैकी भारताकडे सर्वाधिक अणूबॉम्ब, US रिपोर्टचा दावा

nuclear

जगातील प्रगतशील देशांपैकी भारताचा न्यूक्लियर (अणूबॉम्ब) प्रोग्राम सर्वात मोठा आहे. एवढेच नाही तर शस्त्र बनवण्यासाठी भारताकडे व्हीपन-ग्रेड प्लूटोनियमचा आवश्यक तेवढा साठा आहे, असा दावा अमेरिकेतील बेस्ड इंस्टीट्यूट फॉर साइंस अँड इंटरनेशनल सिक्युरिटीने आपल्या 2014 च्या अहवालात केला आहे.

या अहवालानुसार, भारताकडे सद्य:स्थतीत 75 ते 125 अणू बॉम्ब असू शकतात. मात्र, काही दिवसांपूर्वी आलेल्या बुलेटिन ऑफ अॅटॉमिक साइंटिस्ट्सच्या न्यूक्लियर नोटबुक अहवालात म्हटले की, पाकिस्तान न्यूक्लियर शस्त्रात भारतापेक्षा कितीतरी पुढे आहे. त्यांच्या या अहवालानंतर आता हा अहवाल आला आहे.

काय आहे व्हीपन ग्रेड?
व्हीपन ग्रेड न्यूक्लियर मटेरियलच्या शुद्धतेबाबत माहिती देतो. याच्या मदतीने न्यूक्लियर शस्त्र बनवले जातात. साधारणपणे प्लूटोनियम आणि यूरेनियम ग्रेड न्यूक्लियर शस्त्र सर्वाधिक वापरले जातात.

हा अहवाल तयार करण्यात डेविड अलब्राइट आणि सेरेना केलहर यांची महत्त्वची भूमिका आहे. डेविड अलब्राइट यूएस काँग्रेसमध्ये अँटी-इंडिया कॅम्पेन चालवतात. ते इंडो-यूएस सिव्हिल न्यूक्लिअर डीलच्या विरोधात आहेत.