Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

गुगलच्या प्रकल्पाला भारत सरकारची मंजुरी

BALLUN

सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल आता देशात बलुन्सद्वारे इंटरनेट सेवा उपलब्ध करणार आहे. मोदी सरकारने गुगलच्या लून प्रकल्पाच्या पायलट फेजला मंजुरी दिली आहे. लून प्रकल्पांतर्गत गुगल जमिनीवरून 20 किलोमीटरच्या उंचीवर बलून्स ठेवेल. हे बलून्स 40 ते 80 किलोमीटरच्या क्षेत्रात इंटरनेट सेवा देतील.

गुगलने लून प्रकल्प आणि ड्रोन आधारित इंटरनेट ट्रान्समिशनसाठी सरकारकडून मंजुरी मागितली होती. सरकारने सध्या लून प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्याच्या चाचणीला मंजुरी दिली आहे. चाचणीच्या प्राथमिक टप्प्यात गुगल बीएसएनएलसोबत हात मिळवू शकते. यासाठी 2.6 गीगाहर्टत्झ ब्रॉडबँड स्पेक्ट्रमचा वापर केला जाईल. ड्रोन प्रकल्पांतर्गत गुगल 8 मोठय़ा सोलर पॉवर्ड ड्रोन्सद्वारे इंटरनेट ट्रान्समिट करेल.

गुगल याला टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून वापरेल, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून नाही. यामुळे सरकार अशा ठिकाणी देखील इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवू शकेल, जेथे लोकल टॉवर लावणे कठिण आहे. एका बलूनद्वारे मोठे क्षेत्र व्यापता येईल.

लून प्रकल्पांतर्गत कोणत्याही क्षेत्राची निवड करत तेथे 20 किलोमीटरच्या उंचीवर बलून स्थापित केले जातील. इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यासाठी हा वायरलेस कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी एलटीई किंवा 4-जी चा वापर करेल. प्रकल्पासाठी गुगल सोलर पॅनेल आणि विंड पॉवर इलेक्ट्रानिक डिव्हायसेसचा वापर करणार आहे. प्रत्येक बलून 40 ते 80 किलोमीटरच्या क्षेत्रात इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करेल.

या बलून्सची 20 किलोमीटर उंचीवर असणे म्हणजे 60 हजार फूट. म्हणजेच ज्या उंचीवर प्रवासी विमान उड्डाण भरतात, त्याच्या दुप्पट उंची. साधारणपणे प्रवासी विमान 30 हजार फूटाच्या उंचीवर उड्डाण भरतात. हे बलून्स ज्या उंचीवर पोहोचतील त्याला स्ट्रटोस्फीयर म्हटले जाते. बलून पॉलिथिन प्लास्टिकच्या शीटने बनविले जातील.

गुगलने या योजनेवर 2013 मध्ये काम सुरू केले होते. अलिकडेच गुगलने इंडोनेशियात प्रकल्प लून पुढे नेला आहे. इंडोनेशियाचा जियोग्रॉफिकल स्ट्रक्चर प्रकल्पासाठी अनुकूल ठरला आहे. याआधी न्यूझीलंड, कॅलिफोर्निया (अमेरिका) आणि ब्राझील सारख्या काही देशांमध्ये याची तांत्रिक चाचणी घेण्यात येत आहे. पुढील वर्षापर्यंत जगभरात गुगल बलून्सचा रिंग बनविला जाईल. हा रिंग काही भागांमध्ये नेहमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी कव्हरेज देईल.