Whats new

अमेरिकेत सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी

hindi

अमेरिकेमध्ये भारतीय भाषांपैकी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. किमान साडेसहा लाख नागरिक हिंदी भाषेचा वापर करत आहेत, अशी माहिती जनगणना अहवालाद्वारे पुढे आली आहे.

अमेरिकेमध्ये सहा कोटी नागरिक इंग्रजीशिवाय इतर भाषांचा घरी बोलताना आढळतात. 25 कोटी नागरिक इंग्रजीचा वापर करत आहेत. भारतीय भाषांपैकी हिंदी भाषेमधून सर्वाधिक संवाद साधला जातो. सन 2009 ते 2013 दरम्यान अमेरिकेत जनगणनेचे सर्वेक्षण करण्यात आले. यावरून ही माहिती पुढे आली आहे.

अमेरिकेत इंग्रजीशिवाय स्पॅनिश (37.4 कोटी), चायनीज (2.9 कोटी), फ्रेन्च (1.3 कोटी), कोरियन (1.1 कोटी), जर्मन (1.1 कोटी), व्हियेतनामीज (1.4 कोटी), अरेबिक (92 लाख 4 हजार 573), तगालॉग (1.6 कोटी) व रशियन (87 लाख 9 हजार 434) भाषा बोलली जाते.

अमेरिकेत भारतीय भाषांपैकी गुजराती, पंजाबी, बंगाली, मराठी, असामी, काश्मिरी, तेलगू, तमिळी, मल्याळम व ओरिया ही भाषाही बोलली जाते.