Whats new

कॅनडाच्या संरक्षणमंत्रीपदी भारतीय वंशाचे हरजीत सज्जान

harjeet-sajjan

कॅनडाच्या संरक्षण मंत्रिपदावर भारतीय वंशाच्या हरजीत सज्जान यांची वर्णी लागली आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.

ओटावा येथे पंतप्रधान जस्टीन ड्रदेवू यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. 30 जणांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे हरजीत सज्जान यांच्या खांद्यावर संरक्षणमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.

कॅनडाच्या लष्कारात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेले सज्जान दक्षिण व्हॅक्यॅवरमधून निवडून आले आहेत. अफगाणिस्तानातील कंदहारमध्ये तालिबानी दहशतवाद्यांविरोधातील युद्धात सज्जन यांनी सहभाग घेतला होता. भारतीय वंशाचे शीख नागरिक असलेल्या सज्जान यांचा जन्म भारतात झाला. पाच वर्षांचे असताना ते कुटुंबियांसह कॅनडाला स्थायिक झाले.