Whats new

जितू रायला 13 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक

jitu rai

कुवैत येथे सुरू असलेल्या 13 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज जितू रायने पुरूषांच्या 50 मी पिस्तुल नेमबाजीत रौप्यपदक पटकाविले. वरिष्ठ गटात भारताला जितू रायने पहिले पदक मिळवून दिले आहे. या क्रीडा प्रकारात कोरियाच्या डेहुनने 199.2 गुण घेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. जितू रायने या क्रीडाप्रकारात 189.5 गुण घेत रौप्यपदक तर कोरियाच्या जाँगहोने कास्यपदक मिळविले.

या स्पर्धेत कनिष्ठ पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या अखिल शेरॉनने रौप्यपदक तर प्रशांतने कास्यपदक मिळविले. चीनच्या क्युयानने या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक घेतले. कनिष्ठ महिलांच्या विभागात भारताच्या एन. गायत्रीने 50 मी. रायफल प्रोनी प्रकारात 614.6 गुणांसह रौप्यपदक मिळविले. भारताने 7 पदकांची कमाई केली. पुरूष युवा संघाने 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताला सातवे पदक मिळवून दिले.