Whats new

उपग्रहाद्वारे पीक नासाडीचा अंदाज - महाराष्ट्र

SATALLITE

दुष्काळाचा आढावा घेण्याबरोबर वैज्ञानिक पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान पडताळणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे सर्वच राज्यांसमोर आव्हान आहे. अशी माहिती विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) दिली आहे.

‘महाराष्ट्र आता सतत सहावेळा दुष्काळाचा सामना करीत असून, पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपग्रह छायाचित्रांचा वापर महाराष्ट्र सुरू करणार आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक पद्धतीने उपग्रह कसा काम करतो याची पडताळणी केल्यानंतर, याच कामासाठी निर्धारित काही उपग्रह उपयोगात आणले जातील.

दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी उपाय-
उपग्रहांचा वापर करून नुकसानीचा आढावा घ्यावा. पिकांसाठी खास विमा योजना आखून त्याची पारदर्शक व जलद कार्यवाही व्हावी. विम्याचे हप्ते किफायतशीर व सोपे असावेत. विम्याचे हप्ते सवलतीत देण्याची मुभा असावी. शेतकऱ्यांना संस्थात्मक सोपे कर्ज उपलब्ध व्हावे. छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, दुष्काळात सरकारी यंत्रणेने त्यांना तातडीने मदत करावी.