Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

शिवा थापा जागतिक मुष्टियुद्ध क्रमवारीत दुस-या स्थानी

shiva thapa

ऑक्टोंबर २०१५ दोहा येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या शिवा थापाने जागतिक मुष्टियुद्ध क्रमवारीत दुस-या स्थानी झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

थापाने 56 किलो वजनी गटात 1550 गुणासह दुसरे स्थान पटकावले आहे. भारताचा हा 22 वर्षीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंग (2009 कांस्य) व विकास कृष्णन (2011 कांस्य) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याच गटात विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण मिळविलेला आयर्लंडचा मायकेल कॉनलेन 2150 गुणासह अव्वलस्थानी राहिला. दोहा येथील स्पर्धेत 75 किलो मिडलवेट वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणारा विकास सहाव्या स्थानी, तर 91 किलो सुपर हेवीवेट वजनी गटात उपांत्य फेरीपर्यंत जाणारा सतीश कुमार सातव्या स्थानी आहे. आशियाई चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक जेता देवेंद्रो सिंग 49 किलो वजनी गटात 550 गुणासह 13 व्या स्थानी आहे. सुमित सांगवान 81 किलो वजनी गटात 450 गुणासह 18 व्या तर मनोज कुमार 64 किलो वजनी गटात 18 व्या स्थानी आहे.