Whats new

2016 मध्ये ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र कार्यान्वित होणार

agni-5

2014 पासून अल्प पल्ल्याविषयीचे ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची ताकद नऊ वेळा आजमावण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र ‘सुखोई-30 एमकेआय’ या लढाऊ विमानावर बसविलेले होते. डिसेंबर मध्ये या अस्त्रामधील सूचना देणाऱया यंत्रणेची चाचणी घेतली जाणार आहे. 2016 च्या मध्याच्या मानाने त्याची यंत्रणा व सामर्थ्य यांची चाचणी घेतल्यानंतर हवेतून हवेत मारगिरी करणारे हे अस्त्र प्रत्यक्ष कृतीसाठी सज्ज होणार आहे.
पाच हजार किलोमीटरहून जास्त पल्ला असलेले अग्नी-5 हे आण्विक क्षेपणास्त्र भारताने विकसित केलेले आहे. पण दृष्टीच्या टप्प्याबाहेरील बीव्हीआर हय़ा हवेत मारगिरी करणा-या अस्त्राने एक दशकाचा काळ घेतला आहे. सर्व प्रकारच्या वातावरणाला यशस्वी तोंड देणारे ‘अस्त्र’ एकदा सिद्ध झाले की अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायलच्या पंक्तीला भारत जाऊन बसणार आहे. सध्या भारतीय लढाऊ विमानांवर रशियन, प्रेंच आणि इस्त्रायली बीव्हीआर क्षेपणास्त्रs बसविलेली असतात. पण अस्त्र हे स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्र खर्चाच्याबाबतीतही कमी ठरणार आहे.
अस्त्र क्षेपणास्त्राचा सध्याचा पल्ला 44 ते 60 किलोमीटरचा आहे. 2016 च्या डिसेंबरपर्यंत त्याचा सुधारित आराखडा पूर्ण झाल्याने जास्त पल्ल्यासह सामर्थ्यवाहन अस्त्र उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डीआरडीओ) या संस्थेचे प्रमुख डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनी दिली.
जमिनीवरून आकाशात मारगिरी करणाऱया क्षेपणास्त्रानंतर ‘तेजस’ या वेगवान व हलक्या स्वदेशी विमानावर हे अस्त्र बसविण्याचा मनोदय असून अस्त्र-2 चा पल्ला 100 किलोमीटरचा असणार आहे.
अस्त्र प्रकल्प 2004 च्या मार्चमध्ये मंजूर झाला होता. त्यावेळी प्रकल्प खर्च 955 कोटींचा गृहित धरण्यात आला होता. पण तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडल्याने 2014 मे मध्ये सुखोई-30-एमकेआयवर ते क्षेपणास्त्र बसविण्यात आले. त्यानंतर 3.8 मीटर लांबीचे व ध्वनीच्या चौपट वेगाने जाणाऱया या क्षेपणास्त्राची नऊ वेळा यशस्वी चाचणी घेण्यात आली. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर आधारित सावजाचे लक्ष्य पक्के करून त्याचा नाश करणा-या यंत्रणेची चाचणी पुढील महिन्यापासून चालू होणार आहे.
यासाठी हे क्षेपणास्त्र रेडिओ फ्रीक्वेन्सीनेयुक्त यंत्रणेने सज्ज असणार आहे. त्यानंतर शत्रूविमानांचा धुव्वा उडविण्याच्याबाबतीत 2016 च्या मध्याच्या मानाने हे क्षेपणास्त्र सज्ज होणार आहे. हल्ल्याच्यादृष्टीने शत्रूविमानाचे स्थान निश्चित करण्याची इलेक्ट्रॉनिक काऊंटर-काऊंटर मेझर्स (इसीसीएफ) ही यंत्रणा या क्षेपणास्त्रात असून तिला मार्गदर्शन करण्यासाठी रडारही असल्याने हे क्षेपणास्त्र अजिंक्य ठरणार आहे.