Whats new

जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानांकडून ८०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा

modi

'भूतलावरील स्वर्ग' अशी ख्याती मिरवणा-या जम्मू-काश्मीरच्या समग्र विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. श्रीनगरमधील 'शेर-ए-काश्मीर' स्टेडियममध्ये झालेल्या सभेत लाखोंच्या समुदायासमोर पंतप्रधानांनी ही घोषणा केली. काश्मीरने आत्तापर्यंत खूप काही भोगलं आहे, अनेक पिढ्यांची स्वप्नं चिरडली गेली आहेत, मात्र आता मला काश्मीरल पुन्हा 'जन्नत' बनवायचे आहे, असे सांगत पंतप्रधानांनी काश्मीरच्या विकासाकरिता ८० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. 'सबका साथ सबका विकास' हाच आमचा मंत्र असून देशातील कोणताही भाग विकासापासून वंचित राहिल्यास माझं स्वप्नं अधुरं राहिल, त्यामुळे विकासासाठी देशातील सर्व जनतेने आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन मोदींनी काश्मीरच्या जनतेला केले.
काश्मीरसाठी मला जगातील कोणाच्याही सल्ल्याची अथवा विश्लेषणाची गरज नाही. आपल्याला अटलजींच्या पावलांवर पाऊल टाकून चालायचे आहे. याच भूमीवर, याच मंचावर अटलीजींनी 'काश्मीरियत, लोकशाही आणि मानवता' या तीन मंत्राचा सल्ला दिला होता, तोच अनुसरून आपल्याला पुढे जायचे आहे. या तीन मंत्रांच्या खांबांवरच काश्मीरच्या विकासाचा डोलारा उभा राहणार आहे, असे मोदी म्हणाले.