Whats new

2जी स्पेक्ट्रमसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

telecom-tower

दूरसंचार विभागाने 2-जी स्पेक्ट्रमचे उदारीकरण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामुळे ऑपरेटर विद्यमान स्पेक्ट्रमचा वापर करून 4-जीसह अन्य नवीन मोबाइल सेवा देऊ शकणार आहे.
सीएमटीउस-यूएएस-यूल परवानाधारक 800 मेगाहर्ट्झ आणि 1800 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा वापर त्यांच्या पूर्ण वापरासाठी करू शकतात. यानुसार, सर्व ऑपरेटरांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स कम्युनिकेशन, एअरसेल, टाटा टेलीसर्व्हिसेस, वोडाफोन आणि आयडिया यांचा समावेश आहे. यामुळे कंपन्यांना स्पेक्ट्रम भागीदारी आणि व्यवसाय तत्त्वांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी मदत होईल. तसेच उद्योगामध्ये एकात्मतेची प्रक्रिया वाढण्यासाठी मदत होणार आहे.