Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

बिहारमध्ये पुन्हा ‘नितीशराज’

nitis

बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारी जनतेने भाजपाला नाकारत महाआघाडीच्या बाजुने कौल दिल्याचे मतमोजणीच्या ताज्या कलानुसार स्पष्ट झाले आहे. सुरूवातीला आघाडीवर असलेल्या एनडीएला मागे सारत महाआघाडीने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. 243 पैकी महाआघाडीने 158 तर एनडीएला 74 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज आल्याचे स्पष्ट झाले आहे. मतमोजणीच्या ताजा कलानुसार महाआघाडीला 157 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यात नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला 69, राष्ट्रीय जनता दलाला 75, काँग्रेसला 13, तर मित्रपक्षांना 8 जागांवर आघाडी मिळाली आहे. एनडीएला 74 जागांवर आघाडी मिळाली आहे. यामध्ये भाजपाने 61, लोकजनशक्ती पक्षाने 8, हिंदुस्तान आवाम मोर्चाने 3 व आरएलएसपीने 3 जागांवर आघाडी मिळविली आहे. यावरून महाआघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून बिहारचु सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. याउलट विकासाच्या गप्पा मारणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एनडीएला बिहारी जनतेने नाकारले आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज आले आहे.