Whats new

‘वन रँक, वन पेन्शन’ची अधिसूचना जारी

one-rank-one-pension

भारतीय सैन्यदलांतील निवृत्त कर्मचा-याना ‘वन रँक, वन पेन्शन’ योजना लागू करणारी अधिकृत अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने अखेर जारी केली.आता जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार पूर्वीच्या पेन्शनर्सचे पेन्शन सन २०१३ मध्ये निवृत्त झालेल्यांच्या पेन्शनच्या धर्तीवर पुनर्निर्धारित केले जाईल व त्याचे लाभ १ जुलै २०१४ पासून दिले जातील. ज्यांना सध्या सरासरीपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यांचे पेन्शन कमी केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. अधिसूचनेनुसार सुधारित पेन्शनची थकबाकी चार समान वार्षिक हप्त्यांत दिली जाईल. मात्र स्पेशल अथवा लिबरलाईज्ड फॅमिली पेन्शनसह फॅमिली पेन्शन मिळणारे सर्व पेन्शनर व शौर्य पुरस्कारप्राप्त पेन्शनर यांना मात्र एकाच हप्त्यात सर्व थकबाकी दिली जाईल.