Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

36 वर्षांनंतर इराणी महिलेची राजदूतपदी वर्णी

afkham

1979 मधील इस्लामी क्रांतीनंतर इराणी महिलेची दुस-या देशात राजदूत म्हणून पहिल्यांदाच नेमणूक करण्यात आली आहे. मरजिह अकहम या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मलेशियामधील राजदूत बनल्या आहेत. इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद जरीफ यांनी यासंबंधी घोषणा केली. ते म्हणाले, की त्यांना राजदूत बनविण्याचा निर्णय केवळ काही मिनिटांमध्ये घेण्यात आला. परंतु, त्यांच्या प्रवक्तेपदी दुस-याची नियुक्ती करण्यासाठी मात्र चार महिने लागले. 50 वर्षांच्या अकहम मलेशियामध्ये जबेर अन्सारी यांच्यानंतर राजदूताची सूत्रे हाती घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचा हा निर्णय महिलांवरील विश्वास व्यक्त करणारा आहे, असे म्हटले आहे. 2013 मध्ये इराणमधील सार्वत्रिक निवडणुकींमुळे हसन रुहानी राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी त्यावेळी वरिष्ठ जागांवर आपण महिलांची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले होते.