Whats new

रेल्वेमधील 3 अब्ज डॉलर्सचे कंत्राट फ्रेंच कंपनीस

alstom

भारतीय रेल्वेस 800 ‘इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हज’ पुरविण्यासंदर्भातील कंत्राट ऍलस्टॉम या फ्रेंच अभियांत्रिकी कंपनीस मिळाल्याचे स्पष्ट झाले. सुमारे 200 अब्ज रुपये (3 अब्ज डॉलर्स) मूल्य असलेल्या या करारान्वये भारतामध्ये एक उत्पादन विभाग सुरु करण्याचेही कंपनीने मान्य केले आहे. रेल्वे इंजिनला गती देण्यासाठी लोकोमोटिव्हज वापरली जात असल्याचे अधिका-यांनी सांगितले. भारतीय रेल्वे क्षेत्र गेल्या वर्षी परकीय गुंतवणुकीसाठी पूर्णत: खुले करण्यात आल्यानंतर देण्यात आलेल्या काही सर्वांत जास्त किंमतीच्या कंत्राटांपैकी हे एक कंत्राट आहे. नुकतीच जनरल इलेक्ट्रिक या अमेरिकन कंपनीनेही भारतास येत्या 11 वर्षांत 2.6 अब्ज डॉलर्स किंमतीचे ‘डिझेल लोकोमोटिव्हज’ पुरविण्यासंदर्भातील कंत्राट मिळाल्यासंदर्भातील घोषणा केली आहे. जुनाट भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यांतर्गत अशा स्वरुपाची कंत्राटे देण्यात येत आहेत.