Whats new

अरुंधती भट्टाचार्य भारतातील सर्वात शक्तीशाली व्यावसायिक महिला यादीमध्ये प्रथम स्थानावर - फॉर्च्यून इंडिया

bhatachrya

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य भारतातील सर्वात शक्तीशाली व्यावसायिक महिला यादीमध्ये प्रथम स्थानावर कायम आहेत. फॉर्च्यून इंडियाने देशातील सर्वात शक्तीशाली 50 महिलांची नवी यादी जाहीर केली आहे. यानुसार, व्यवसाय जगतात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य पहिल्या स्थानावर, आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर दुस-या स्थानावर आणि ऍक्सिस बँकच्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा तिस-या स्थानावर आहेत.

फॉर्च्यून इंडियाने जाहीर केलेल्या यादीनुसार, एचपीसीएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक निशी वासुदेवा चौथ्या क्रमाकांवर आहेत. तर एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह-संस्थापक जिया मोदी व कैपजॅमिनीच्या मुख्य कार्यकारी अरुण जयंती संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहेत.

फॉर्च्यून इंडियाच्या मागच्या यादीनुसार, देशातील टॉप 5 व्यवसाय करणा-या महिलांमध्ये 4 आपल्या स्थानावर कायम आहेत. तर अरुण जयंती मागील वर्षी 7 व्या क्रमाकांवर होत्या. आता त्यांचे स्थान वधारले आहे. भारताच्या 50 व्यावसायिक महिलांच्या 2015 च्या फॉर्च्यून सूचीमध्ये फक्त दोन नावे सहभागी करण्यात आली आहेत.

नवीन नावांच्या सूचीमध्ये पोर्टियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मीना गणेश 43 व्या स्थानावर आणि इरॉस इंटरनॅशनलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती देशपांडे 50 व्या स्थानावर आहेत. अरुंधती भट्टाचार्य यांच्या कार्यकाळात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कामगिरीमध्ये चांगली प्रगती झाली आहे. त्यांनी एनपीए कमी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न केला आहे. मागील वर्षापासून एसबीआयमध्ये अध्यक्षा झाल्यापासून त्यांनी बँकेच्या गुणवत्ता वाढीसाठी, बँक खर्च कमी करण्यासाठी आणि बँकेचा नफा वाढण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच त्यांचे प्रथम क्रमाकांवर आहे, असे फॉर्च्यून इंडियाने म्हटले आहे.