Whats new

भारताची पदकतालिकेत अव्वलस्थानी झेप-13 वी आशियाई नेमबाजी स्पर्धा

india

कुवेत येथे सुरु असलेल्या 13 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही भारतीय नेमबाजांनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत पदकांची लयलूट केली. भारताने 12 सुवर्ण, 8 रौप्य व 8 कांस्यपदके पदकांची कमाई करताना पदकतालिकेत चीनला मागे टाकत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. अजून स्पर्धेचे तीन दिवस बाकी आहेत.

भारताच्या खात्यावर आता 12 सुवर्ण, 8 रौप्य व 8 कांस्यपदकासह एकूण 28 पदकांची नोंद आहे. तर चीन 11 सुवर्ण, 8 रौप्य व 9 कांस्यपदकासह एकूण 28 पदकासह दुस-या स्थानी आहे. पुरुषांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात महेंद्रसिंगने 572 गुणाची कमाई करताना रौप्यपदक जिंकले. तर सांघिक प्रकारात महेंद्रसिंग, गुरप्रीत सिंग व नीरज कुमारसहित 1676 गुणाची कमाई करत कांस्यपदक मिळवले. चीनला सुवर्ण तर कोरियाला रौप्यपदक मिळाले. महिलांच्या 50 मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात लज्जा गोस्वामीने अंतिम फेरीत स्थान मिळाले, पण अंतिम फेरीत 404.6 गुण मिळाल्यामुळे तिला सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. सांघिक प्रकारात लज्जा गेस्वामी, अंजुम मोदगिल व एलिझाबेथ सुसानने 1734 गुणाची कमाई करत कांस्यपदक मिळवले. या प्रकारात चीनला सुवर्ण तर कोरियाने रौप्यपदक मिळवले. पुरुषांच्या ज्युनियर पिस्तूल प्रकारात अचल प्रताप सिंगने 562 गुणासह सुवर्ण मिळवले. सांघिक प्रकारात अचल प्रताप, शिवम शुक्ला व रितूराज सिंगने भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली.