Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

पॅरिस मास्टर्सचे जेतेपद ज्योकोव्हिककडे

novak

एटीपी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हॅक ज्योकोव्हिकने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या अँडी मरेला पराभूत करत जेतेपद पटकावले. ज्योकोव्हिकचे हे वर्षातील 10 वे जेतेपद ठरले. तर पॅरिस मास्टर्सचे हे त्याचे चौथे जेतेपद ठरले.

ज्योकोव्हिकने 90 मिनिटांत मरेला 6-2, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. विशेष बाब म्हणजे ज्योकोव्हिकचे हे वर्षातील 10 वे विजेतेपद ठरले. उपांत्य फेरीत त्याने स्वीत्झर्लंडच्या स्टॅन वांवरिकाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर दुस-या लढतीत स्पेनच्या डेव्हिड फेररला मरेने सहज पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यंदाचे वर्ष ज्योकोव्हिकसाठी चांगले गेले असून अमेरिकन ओपनसहित त्याने ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपदही पटकावले होते.