Whats new

बेहरिन इंटरनॅशनल: समीर वर्माला जेतेपद

smeer-verma

भारताचा युवा बॅडमिंटनपटू समीर वर्माने कारकिर्दीतील दुस-या जेतेपदाला गवसणी घालताना बहरिन इंटरनॅशनल चँलेजचे जेतेपद पटकावले. समीरने बेहरिन येथे सिंगापूरच्या झी लियान डेरेक वाँगला 21-14, 21-10 असे पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेत अग्रमानांकन प्राप्त असलेल्या समीरने याआधी जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानी असलेल्या मिन निगुयानला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते तर उपांत्य फेरीत मायदेशी सहकारी राहूल यादवला 21-13, 21-17 असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. ‘बेहरिन इंटरनॅशनलच्या जेतेपदामुळे मला खूप आंनद झाला आहे. शिवाय, गेल्या दोन आठवडय़ापासून खेळत असल्यामुळे मला याचा फायदाही झाला’ असेही त्याने सांगितले.