Whats new

भारताच्या नव्या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

gsat-15-satellite

भारताचा दुरसंचार वहनासाठी जी सॅट-15 या उपग्रहाचे फ्रांस गियानातील कोऊरो येथून यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले आहे. या उपग्रहाचे एरियन-5 या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचा वापर दुरसंचार सेवेसाठी, हवाई वाहतुकीच्या आपतकालीन सेवेसाठी आणि मदतीवेळी दिशादर्शक म्हणून करण्यात येणार आहे. भारताच्या जी सॅट-15 या उपग्रहाबरोबर अरबसॅट-6बी(बीएडीआर-7) या दोन उपग्रहाचे जिओसिंक्रोनोअस ट्रान्सफर ऑरबिट (जीटीओ) च्या सहाय्याने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले, असे एरियनस्पेस या संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.
भारताचा जी सॅट हा उपग्रह 3,164 किलोग्रॅम वजनाचा असून त्याच्या निर्मितीसाठी 275 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या उपग्रहावर 24 ट्रान्सपॉन्डर लावण्यात आले असून डीटीएचच्या प्रसारणासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. जी सॅट-8 आणि जी सॅट-10 नंतर गगन प्रणाली असणारा हा तिसरा उपग्रह आहे. कर्नाटकातील हसन येथील नियंत्रण कक्षाने उपग्रहाकडून नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पुढील प्रक्रिया सुरू आहे. लवकरच उपग्रह पुढील माहिती प्रसारणाचे काम सुरू करील असे इस्त्रो उपग्रह केंद्राचे संचालक एम. अन्नादुराई यांनी सांगितले. भारत पुढील वर्षी जी सॅट-17 आणि जी सॅट-18 या संदेश वाहक उपग्रहाचे प्रक्षेपण एरियन रॉकेटच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.