Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

आता पुण्यातही होणार कसोटी क्रिकेट सामने

cricket

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक बैठकीमध्ये पुण्याला कसोटी केंद्राचा दर्जा देण्याचा निर्णय झाला. या बैठकीमध्ये एकूण सहा नव्या स्टेडियमला कसोटीचा दर्जा मिळाला. यामध्ये पुण्यासह राजकोट, विशाखापट्टणम, धर्मशाला, इंदूर आणि रांची यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचे यजमानपद भूषविण्याची संधीही पुण्याला लगेचच मिळण्याची शक्यता आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील चौथी आणि शेवटची कसोटी दिल्लीमध्ये होणार आहे. मात्र, ‘बीसीसीआय‘च्या निकषांनुसार या सामन्याची तयारी पूर्ण झाली नसल्यास आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानगी मिळविण्यात अपयश आल्यास हा सामना दिल्लीऐवजी पुण्यामध्ये घेतला जाऊ शकतो, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
धर्मशाला स्टेडियमला २०१२ साली आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्याची परवानगी मिळाली होती. राजधानी शिमलापासून २५० किमी अंतरावर असलेल्या या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता २१ हजार ६०० इतकी आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमवर आतापर्यंत आयपीएलचे नऊ सामने खेळविण्यात आले असून हे भारतातील पहिले असे स्टेडियम आहे; जेथे थंड वातावरणास अनुकूल ठरतील, असे गवत निर्माण करण्यात आले आहे.