Whats new

भारत सर्वाधिक कमी उदार देश

donetion

अपरिचित व्यक्तींना मदत करणे, चांगल्या कामासाठी पैसे आणि वेळ देणे यांचा विचार केल्यास दक्षिण आशियातील आठ देशांत भारत सर्वांत कमी उदार देश असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
लंडनस्थित चॅरिटेबल एड फाऊंडेशनने (सीएएफ) याबाबतीत केलेले सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे. या यादीत जागतिक स्तरावर भारत १०६ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे भारताचा शेजारी आणि गरीब समजला जाणाऱ्या म्यानमारने प्रथम क्रमांक मिळविला आहे. हा देश सर्वांत उदार आहे.
म्यानमारपाठोपाठ अमेरिका दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, कॅनडा चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थावर येतात. त्यानंतर ब्रिटन, नेदरलँड, श्रीलंका, आयर्लंड, मलेशिया यांचा क्रम लागतो. ३३.४ कोटी लोकांनी अपरिचित लोकांना मदत केली. १८.३ कोटी लोकांनी रुपये दिले, तर १५.६ कोटी लोकांनी आपला वेळ दिला.