Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

जगातील १०० आघाडींच्या विद्यापीठांमध्ये ‘आयआयएस बेंगळुरू’

bengeleru

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासाठीच्या जगातील १०० आघाडींच्या विद्यापीठांमध्ये बेंगळुरूतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स‘ अर्थात आयआयएसने स्थान मिळवले आहे. जगातील १०० आघाडींच्या विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयएस ९९ व्या क्रमांकावर आहे.
‘टाइम्स हायर एज्युकेशन(टीएचई) रँकींग फॉर इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी’मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टेनफोर्ड, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(एमआयटी) या तीन अमेरिकन संस्थांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. उर्वरित क्रमांकावरही अमेरिकन संस्थांचा दबदबा आहे. आयआयएस बेंगळुरू या क्रमवारीत ९९ व्या स्थानावर आहे. ‘टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकींग’चे संपादक फिल बेटी यांनी भारताने या यादीत स्थान मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यावर्षी भारताला महत्त्वपूर्ण इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी क्रमवारीत स्थान मिळवण्यात यश आले, हे समाधानकारक आहे, असे ते म्हणाले.