Whats new

इंडियाबुल्स ब्रिटिश बँकेचे ४० टक्के समभाग विकत घेणार

indiabulls

इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने १० कोटी डॉलर्स (६६१कोटी रुपये) मध्ये ब्रिटनच्या ओक नॉर्थ बँकेचे ३९.७६ टक्के समभाग खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिग्रहणामुळे आपल्याला जमा स्वीकार करणाऱ्या फ्रेंचायजीच्या रूपात आपली संरचना तयार करण्यास मदत मिळेल, असे इंडियाबुल्सने म्हटले आहे.
भारत आणि ब्रिटनमधील संबंद्ध नियामकांच्या आवश्यक मंजुरीच्या आधारावर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड १० कोटी डॉलर्समध्ये ब्रिटनच्या ओक नॉर्थ बँकेत ३९.७६ टक्के भागीदारी खरेदी करणार आहे. त्यामुळे कंपनी आता या बँकेत सर्वांत मोठी शेअरधारक बनेल,’ असे इंडियाबुल्सने स्पष्ट केले.