Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

फेडरल बँकेकडून गिफ्ट सिटीमध्ये आयएफएससी बँकिंग सुरू

fedral-bank

फेडरल बँकेकडून गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये (गिफ्ट सिटी) इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर (आयएफएससी) बँकिंग युनिट (आयबीयू) सुरू करण्यात आले आहे.
आयबीयू सुरू केल्यामुळे बँकेला भारतातील निर्यातकाच्या ग्राहकांसहित व्यक्ती, रिटेल ग्राहक, एचएनआय, याचबरोबर परदेशी एटीटींच्या निधीविषयक गरजा पूर्ण करता येतील. रुपयांव्यतिरिक्त अन्य चलनांमध्येही व्यवहार करता येतील. बँक भारतीय कंपन्यांच्या परदेशात नोंदणीकृत संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या, संयुक्त कंपन्या यांनाही सेवा देऊ शकते. बँकेला परकीय चलनातील बॉरोइंगही स्वीकारता येईल. त्याचा मुदतपूर्ती कालावधी एक वर्षाहून अधिक असेल. आयबीयूमार्फत बँकेला आता देशांतर्गत ग्राहकांच्या परकीय चलन गरजा पूर्ण करण्यासाठी एक्स्टर्नल कमर्शिअल बॉरोइंग्सअंतर्गत (ईसीबी) कर्ज देता येईल.