Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

स्वच्छ ऊर्जेसाठी ब्रिटनची मोठी गुंतवणूक

indian-britan

अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील सुमारे ३.२ अब्ज पौंड किमतीच्या व्यावसायिक करारावर भारत आणि ब्रिटनने स्वाक्षऱ्या केल्या. स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रामधील गुंतवणुकीला चालना देण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले असून, स्वच्छ ऊर्जा परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी नवे शोध आणि संशोधनावर जोर देण्याच्या दृष्टीने भारत आणि ब्रिटनने करार केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनीही स्वच्छ ऊर्जेच्या मुद्यावर भर देत याबाबत कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.
पारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील कराराबाबत परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले असून, वातावरणातील बदलांबाबतच्या उपाययोजनांसाठी खास निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. जागतिक स्तरावर २०२० पर्यंत सुमारे शंभर अब्ज डॉलरचा निधी सार्वजनिक आणि खासगी स्रोतांद्वारे उभा करण्याच्या आपल्या वचनावर विकसित देश ठाम असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या परिणामांकडे गांभीर्याने पाहत असून, हे शतकातील सर्वांत मोठे आव्हान आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्वच्छ ऊर्जा संशोधन कार्यक्रमासाठी एक कोटी पौंडांचा निधी संयुक्तरीत्या उपलब्ध करून देण्याची तयारी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी दर्शविली आहे. या वेळी कॅमेरॉन यांनी भारत आणि आफ्रिकेतील अपारंपरिक ऊर्जेशी संबंधित प्रकल्पांसाठी मोठा निधी ब्रिटन उपलब्ध करून देईल, अशी घोषणा केली.
ब्रिटनसोबत आतापर्यंत झालेले करार-
· ब्रिटनमधील ऊर्जा कंपन्यांकडून भारतातील गुंतवणूक २.९ वरून ३.४ अब्ज पौंड
· किंग्ज कॉलेज हॉस्पिटल, नॅशनल हेल्थ सर्व्हिस ट्रस्ट आणि इंडो-ब्रिटन हेल्थकेअर यांच्यात चंडीगडमध्ये किंग्ज कॉलेज हॉस्पिटल स्थापण्याबाबत करार.
· मर्लिन एंटरटेन्मेंटची भारतात पहिल्यांदाच गुंतवणुकीची घोषणा. २०१७ पर्यंत नवी दिल्लीत मादाम तुसाँ वस्तुसंग्रहालय बांधण्यात येईल.
· जेनस एबीसी १० लाख पौंडच्या मदतीने पुण्याजवळ आर्ट फॅसिलिटी उघडणार
· ब्रिटन आणि युरोपमध्ये सौरसंच बनवणाऱ्या ‘लाइफसोर्स’ची दोन अब्ज पौंड गुंतवणुकीची घोषणा.
· व्होडाफोन ‘मेक इन इंडिया’अंतर्गत योजनेच्या मदतीसाठी भारतात १३,००० कोटी रुपये गुंतवणुकीची घोषणा
· ‘इंटेलिजंट एनर्जी’चा स्वच्छ ऊर्जेअंतर्गत २७,४०० टॉवर उभारण्यासाठी करार
· हॉलंड ॲण्ड बॅरेट इंटरनॅशनलचा अपोलो हॉस्पिटलसाठी दोनशे लाख पौंडचा व्यवहार
· इंडियन बुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडची ओकनार्थ बॅंक लिमिटेडमध्ये ६६० लाख पौंडची गुंतवणूक
· सौरशक्तीचा लाभ मिळणाऱ्या १०२ देशांना एकत्र करणार
· २०१९पर्यंत संपूर्ण स्वच्छतेचा आणि २४ तास वीज पुरवण्याचा विडा
· १७५ गिगावॉट अपारंपरिक ऊर्जेचा विचार
· भारताने गरीब राहण्याचे कारण नाही
· शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेतले सगळे देश भारताशी बोलणी करण्यासाठी सज्ज
· ब्रिटनमधील ‘ओसीआय’ प्रक्रिया सुलभ बनवणार
· लंडन-अहमदाबाद थेट विमान सेवा १५ डिसेंबरपासून