Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

ब्रिटन ‘ल्यूमियेर लाइट फेस्टिव्हल’ मध्ये रंगबेरंगी ढगाची निर्मिती

light-pic_

ब्रिटनमधील ‘ल्यूमियेर लाइट फेस्टिव्हल’ ला नोव्‍हेंबर२०१५ पासून शानदार सुरुवात करण्यात आली आहे. या उत्सवाची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली होती. गेल्या सहा वर्षात देशातील सर्वा मोठा लाइट फेस्टिव्हल म्हणून या फेस्टिव्हलची ओळख आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये जगभरातील नामवंत कलाकार आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी देशात दाखल होतात. वे लेजर, एलईडी लाइटचे 3-डी इफेक्टने बनविलेल्या विशेष कलाकृती येथे सादर केल्या जातात. डरहममध्ये या वर्षी कॅनडाचे आरसी ब्राऊन आणि वेयन गॅरट यांनी सहा हजार विद्युत बल्बच्या साहाय्याने पाण्याने कोसळणा-या विशेष ढगाची निर्मिती केली आहे. हा ढग परिसरात विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याशिवाय शहरातील काही इमारतींचा विशेष पध्दतीने वापर करून त्यांचा कॅनवास म्हणून वापर करण्यात आला आहे. त्यावर आकर्षक रंगबेरंगी चित्रे साकारण्यात आली आहेत. या फेस्टिव्हलला देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देत असून, 2014 मध्ये येथे 1.75 लाख पर्यटकांनी भेट दिली होती.