Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

लंडनमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

Dr. B R Ambedkar memorial in London

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवासस्थानाच्या माध्यमातून समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश जगाला कायम प्रेरणा देत राहील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. डॉ. आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनमधील किंग हेन्री मार्गावरील निवासस्थान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी या निवासस्थानाला भेट दिली आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली दुर्मीळ छायाचित्रे आणि अन्य संस्मरणीय वस्तूंची माहिती घेतली. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भावपूर्ण अभिवादन केले. पंतप्रधान मुंबईत इंदू मिल स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना या निवासस्थानाला भेट देण्याची विनंती केली होती.