Whats new

रामदेव बाबांचे पतंजली आटा नूडल्स बाजारात

atta nooduls

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदने तयार केलेल्या इन्स्टंट आटा नूडल्सचा अखेर भारतीय बाजारपेठेत प्रवेश झाला आहे. यावेळी पतंजलीकडून हेल्थ ड्रिंकदेखील सादर करण्यात आले आहे. हानिकारक असल्याच्या संशयावरून बंदी घालण्यात आलेल्या ‘मॅगी’ नूडल्सचेही आता भारतीय बाजारपेठेत पुनरागमन झाले आहे. त्यामुळे पतंजली व नेस्ले यांच्या उत्पादनांची थेट स्पर्धा होणार आहे.

"झटपट खाओ, बेफिक्र खाओ" ही कॅचलाईन देऊन आपल्या इन्स्टंट नूडल्समध्ये आरोग्यासाठी हानिकारक लीड व मोनोसोडियम ग्लुटामेट नसल्याचा दावा केला आहे. हे आटा नूडल्स हे स्वदेशी चळवळीचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. पतंजली नूडल्सची किंमत 15 रूपये आहे. आटा नूडल्सनंतर आता पतंजली बेबीकेअर प्रोडक्ट्स बाजारात आणण्याची तयारी करत असून डिसेंबरपर्यंत ते बाजारात आणले जातील असे सांगण्यात आले आहे.

आरोग्यास हानिकारक द्रव्याचे मर्यादेपेक्षा अधिक प्रमाण असल्याने आढळून आल्याने ‘नेस्ले इंडिया’च्या मॅगी नूडल्सच्या उत्पादनावर सरकारने देशभर बंदी घातली होती. याविरोधात नेस्ले कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने मॅगीच्या नमुन्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश दिले होते.